प्रसाद शुगर अँड अलाइड अॅग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड मध्ये आम्ही साखर निर्मिती प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यातून मूल्य निर्माण करण्यावर विश्वास ठेवतो. आमचे उपउत्पादने: मळी (Molasses), बगॅस (Bagasse), प्रेसमड (Pressmud) आणि राख ही केवळ अवशेष नसून अनेक उद्योगांना आधार देणारी महत्त्वाची साधने आहेत. मळी हा डिस्टिलरी आणि जनावरांच्या खाद्यासाठी प्रमुख कच्चा माल आहे. बगॅस पर्यावरण पूरक इंधन व कागद निर्मिती साठी मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. प्रेसमड मातीस सेंद्रिय खत म्हणून पोषण देतो तर राखेचा वापर शेती आणि बांधकाम क्षेत्रात केला जातो. या उपउत्पादनांच्या कार्यक्षम वापरा मधून आम्ही शाश्वतता प्रोत्साहित करतो, कचरा कमी करतो आणि हरित भविष्य घडविण्यात हातभार लावतो, तसेच आमच्या हितधारकां साठी मूल्यवर्धन करतो.